Type Here to Get Search Results !

मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन जागे विरूद्ध खापरी येथील नागरिकांनी आक्षेपार्हत दिले निवेदन.

मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन  जागे विरूद्ध खापरी येथील नागरिकांनी  आक्षेपार्हत  दिले निवेदन.

     प्रतिनिधी/पंकज नेहारे

मारेगाव नगरपंचायतने खापरी येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची निवड केली असुन भुमापन क्रमांक५१ मधील एकुण क्षेत्र ४.१९हे आर अधिक पो.ख.०.१९हे आर पैकी १.००हे आर शासनाचे मालकीची शेत जमीन मागणी केली आहे.
मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन  जागे विरूद्ध खापरी येथील नागरिकांनी  आक्षेपार्हत घेवून तहसीलदार यांना निवेदन  दिले आहे  खापरी गावाला लागून असल्याने मारेगाव नगरपंचायतने  घनकचरा व्यवस्थापन उभारले गेले व घनकचरा टाकला गेला तर  खापरी गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवून  विविध प्रकारच्या आजाराला  निमंत्रण देवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते व  भुमापन क्रमांक५१क्षेत्र ४.१९आर ही जागा आधीच खापरी गावाला पुनर्वसन  केलेली  जागा असल्याने या जागेच्या बाजूला विद्युत
विभागाचे सबटेशन असुन शहरातील घाण गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात करण्यास कारणीभूत ठरू शक्यते त्यामुळे ही जागा देवू नये असा इशारा खापरी येथील नागरिकांनी आपेक्षार्हता तहसीलदार यांना  निवेदन   दिले आहे. ही जागा दिली तर खापरी येथील नागरिकांनी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी उपस्थित सुरेश पाचभाई, संतोष आवारी,प्रभाकर कुचनकर, संदिप भिमराव उरवते सुनील आवारी यांच्या सह गांवातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies