५५हजाराची लाच घेताना तहसीलदारा सह.संगणक आँपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात
परभणी: रेतीच्या ट्रकवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तहसील कार्यालयाचे तहसीलदार व संगणक आँपरेटर यांनी ५५हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले आहेत. तहसीलदार आशिष कुमार बिरादार वय वर्षिय५० असे तहसीलदार व संगणक आँपरेटर सय्यद इसाक सय्यद रहिम वय वर्ष ५०असे लाच घेणाऱ्या अधिकारी व आँपरेटर यांचे नाव आहे. २२ वर्षीय व्यक्तीने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्या तक्रारी च्या आधारे
२२वर्षीय तक्रारदार यांचा रेती वाहतूकचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या रेतीच्या ट्रक मधुन रेतीची वाहतूक करताना कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तहसीलदार आशिष बिरादार यांनी ५५ हजार रूपयांची मागणी केली असल्याने २२ वर्षीय तक्रार याची पैसे देण्याची मानसिकता नसल्याने तक्रारदार यांच्या तक्रारी वरूण आँपरेटर सय्यद इसाक याला रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असुन ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर अप्पर पोलीस अप्पर अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे व परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक निलेश सुरडकर भारत हुंबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.