२५ वर्षीय अज्ञात युवकाचा आढळला मृतदेह
घोडदरा येथील घटना
प्रतिनिधी/ पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील सात किलोमीटर अंतरावरील घोडदरा येथील २५ वर्षीय युवकाचा मृतदेह घोडदरा परिसरातील एका शेतकऱ्यांच्या पराटी मध्ये आढळून आला असुन अज्ञात युवकाचा खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. युवकाच्या मृतदेह घोडदरा येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंदाजे १०वाजतच्या दरम्यान गजानन धनवे यांच्या शेतात २५वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला असल्याने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपडेट-सदर युवकाची ओळख पटली असून मृतकाचे नाव प्रमोद नामदेव रायपुरे वय वर्षे २२ असुन मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.