पंचायत समिती वसमत येथे महा आवास अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी:तुकाराम भरकाडे
पंचायत समिती वसमत प्रधानमंत्री आवास योजना/ राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आमदार राजूभैया नवघरे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण सभापती महादेव
आप्पा एकलारे, अंबादास मामा भोसले, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे, उपसभापती विजय नरवाडे, सभापती प्रतिनिधी म्हणून विश्वनाथ धोसे, पंचायत समिती सदस्य सुपेकर, नाना जामगे, मिरकुटे, सह गट विकास अधिकारी श्री. गोपाळराव कल्हारे, विस्तार अधिकारी श्री. बी टी शिंदे, सुनील अंभोरे गट समनवयक बी सी खंदारे व इतर अधिकारी, कर्मचारी पुरस्कार प्राप्त गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार आमदार राजुभैया नवघरे यांनी मार्गदर्शन करताना तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने राबवित असलेल्या अनेक योजने बाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेला निस्वार्थी पणे न्याय मिळवून द्यावा असे मत व्यक्त केले...