माजी आमदार प्रा. राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर; आर्णी-केळापुर मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची चिन्हे
यवतमाळ : आर्णी-केळापुर मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
माजी आमदार तोडसाम यांनी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला होता. विद्यमान आमदार असताना२०१९ च्या निवडणूकित त्यांचे तिकीट कापण्यात आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून आपली ताकद दाखवली होती. तिकीट कापल्यापासून प्रा. तोडसाम हे नाराज असल्याचे बोबले जात होते. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी देखील आहे.राज कारणातून समाजकारण करता यावे, सन्मान मिळावा यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत.
