Type Here to Get Search Results !

५० हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षका सह दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबननिरीक्षक अजित जाधव यांना मुकुटबन पोलीस ठाण्याचा प्रभार जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई

५० हजाराची लाच घेणाऱ्या  पोलीस निरीक्षका सह दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

निरीक्षक अजित जाधव यांना मुकुटबन पोलीस ठाण्याचा प्रभार
 
  जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई
   
झरीजामणी तालुक्यातील मुकचबन पोलीस स्टेशन गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले मुकुटबन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर तत्कालीन रायटर सध्या मारेगाव पोलीस स्टेशन येथील  असलेले पोलीस शिपाई सुलभ उईके यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.  ट्रॅक्टर मालकाकडून मध्यस्थाद्वारे ५० हजारांची लाच घेऊन वरून खोटा गुन्हा ही दाखल केला असा आरोप तक्रारकर्ते दीपक उदकवार यांनी करत याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. याबाबत पैसे घेतल्याची एक   ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला होती. एकतर पैसेही घेतले आणि वरून गुन्हाही दाखल केला याबाबत तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू होती. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत होता. दरम्यान मुकुटबन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा प्रभार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी घेतला आहे. 
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुकुटबन येथील रहिवासी असलेले दीपक उदकवार हे हॉटेल चालक आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची आवश्यकता होती. पाऊस सुरू असल्याने रेती मिळत नसल्याने त्यांनी ड्रायवरला रेती आणायला सांगितली. दरम्यान एक महिन्या आधी येडशी गावाजवळ पोलीस निरिक्षक धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर यांनी सकाळच्या ६   वाजताच्या सुमारास त्यांचा ट्रॅक्टर पकडला जागांवर कोणताही पंचनामा न करता ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्टेशनला लावला.

पोलिसांनी ट्रक्टर मालक दीपक उदकवार यांना घटनेच्या दिवशी सकाळी ९ वाजता पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले. उदकवार स्टेशन मध्ये गेले असता पोलीस निरीक्षक सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर हजर होते. दोघांनीही दीपक याला १ लाखांची लाच मागितल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप होता. तसेच पैसे न दिल्यास रेती चोरीचा गुन्हा दाखल करतो व महसूल विभागाकडे ट्रॅक्टर सोपवून दीड लाखाचे दंड ठोठवायला लावतो असे देखील धमकावले.

पोलीस निरीक्षक सोनुने यांचे तत्कालीन रायटर सुलभ उईके यांनी मोबाईलद्वारे दीपक यांना फोन करून १ लाखांवरून ५० हजारांच्या बदल्यात कोणताही गुन्हा दाखल न करण्याची सेटलमेंट केली. त्यानुसार ५० हजार रुपये देण्याचे कबूल झाले. ठाणेदार सोनुने व ऋषी ठाकूर यांनी ५० हजार आणण्याकरिता होमगार्ड निखिल मोहितकर यांना दीपक यांच्या हॉटेल मध्ये पाठविले.

होमगार्ड मोहितकर हे हॉटेल मध्ये गेले. त्यांनी दीपक यांच्या पत्नी जवळून ५० हजार रुपये घेतले व ठाणेदार सोनुने यांना दिले असा दीपक उदकवार यांचा आरोप आहे. मात्र ५० हजार देऊन देखील निरिक्षक व सहाय्यक फौजदार यांनी दीपक उदकवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. दरम्यान आकसेपोटी चालकांवर गुन्हा दाखल न करता उदकवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असा देखील तक्रारकर्त्यांचा आरोप होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies