पांदन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे नागरिकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन
रस्ताची उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास
मारेगाव नगरपंचायतच्या होणाऱ्या निवडणुकीला बहिष्कार टाकणार
मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक १च्या नागरिकांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार तहसीलदार सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी....
प्रतिनिधी/ पंकज नेहारे
मारेगाव : अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला पाठबळ पांदन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना आपले सरकार वर तक्रार दाखल केली असता जिल्हाधिकारी कार्यालय कडुन निष्काजी पणामुळे चौकशी करून केलेली तक्राराची चौकशी केली असे सांगून त्यावर पडदा टाकण्यात आला आहे. शर्मा काँन्ट्रँक्टर प्रभाक क्रमांक१मधील बाधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असुन वरिष्ठांनी केळाची टोपली दाखवत काम चागल्या दर्जाचे असल्याचे कागदी घोडे चालवून उत्तम दर्जाचे रस्ताचे काम असल्याचे दाखले आहे. प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर लक्षात येते, निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती अभियंता नगरपंचायत काम पाहिल्यानंतर निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे मान्य केले. तरी कंत्राटदाराला काम सुरु ठेवण्यास परवानगी दिली व प्रभाग क्रमांक१ नागरिकाच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप प्रभाग क्रमांक एक मधील नागरीकांनी केला आहे. त्यामुळे सदर बांधकामाची योग्य तपासणी करुन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक एकच्या नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनातून मागणी केली आहे. रस्त्याचेच काम निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे . यातून बांधकाम विभागाचे व नगरपंचायतचे अधिकारी व कंत्राटदार डच्चू देत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही नागरीका कडून बोलत जात आहेत.