नवरगाव येथील एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव संतोष अभिमान मोहुर्ले (40) असे आहे. मंगळवारी दि. 24 ऑगस्ट रोजी संतोष यांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वतःचे राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. मात्र दि.25/8/2021 त्यांचा मृत्यू झाला.
संतोष अभिमान मोहुर्ले हे नवरगाव येथील रहिवाशी होते. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांनी घरी विष प्राशन केले. त्यामुळे त्यांनी प्रकृती धासळली. विष पिल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळताच त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथे हलविण्यात आले . परंतु चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना आज बुधवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी संतोष यांचा मुत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण सध्या तरी कळू शकले नाही.