दिव्यांग महिलेच्या आंदोलनाला कलगीतुर्याची किनार
= उपोषण दडपण्यासाठी दबावतंत्राचा वापर
मारेगाव:-(दीपक डोहणे)
ती लढते आहे सतत.तिचा संघर्ष अजूनही संपलेला नाही.अपघातात तिचे पाय चेंदामेंदा झाले.कायम अपंगत्व आले,मात्र ती लढली मृत्यूशी अन त्याला झुंज देत परतली. मागील महिन्यात ठाणेदार ने तिला प्रचंड अश्लिल शिव्या दिल्याचा आरोप करीत आता ती न्याय मिळावा यासाठी भर पावसात उपोषण करून लढत आहे, तिचा संघर्ष अजूनही संपला नाही.
सीमा अफरोज खान ही महिला एक ट्रक अपघातात दोन्ही पाय गमावून बसली.मागील महिन्यात दारू विक्री च्या प्रकरणात मारेगाव चे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी नाहक तिचे नाव गोवले,धड चालत फिरता येत नसलेल्या सीमा वर गुन्हा दाखल केला तिला दुपारी जमानत देऊन सुद्धा सुडबुद्धीने संध्याकाळ पर्यंत बसवून ठेवले.गुडघ्यापासून दोन्ही पाय कापून असल्यामुळे तिला प्रचंड त्रास झाला.या अन्यायाविरुद्ध 5 जुलै पासून ती सतत नऊ दिवसापासून मारेगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणला बसली आहे.पोलीस तीच्यावर नानातऱ्हे दडपण आणून उपोषण मागे घायला मजबूर करीत आहे.पण सीमा हार मानायला तयार नाही.उपोषण खोटे आहे हे दाखविण्यासाठी काही 'तत्पर अन अधीर' समाजसेवकांनी निवेदन दिले.पडद्याआड मात्र कोणी दुसरेच सूत्रधार होते.सारा प्रकार त्या अपंगाला मानसिकरित्या खच्चीकरण करण्यासाठी आहे अशी चर्चा आहे मात्र याने सीमा च्या आंदोलनाला काहीच फरक पडला नाही.उपोषण मुळे यवतमाळ च्या मेडिकल कालेज ने तिच्या गंभीर प्रकृती बाबत अहवाल दिला आहे.तिची साखर पातळी व रक्त लेव्हल चिंताजनक झाली आहे वरून तिला सिकलसेल चा गंभीर आजार आहे.मात्र ती न्याय मिळण्यासाठी आजही ठाम आहे. तिच्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी कालच प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. भर पावसात सीमा लढते आहे,आपल्या इमानदारीसाठी प्रसिद्ध पोलीस विभाग मात्र याकडे लक्ष द्यायला अजूनही तयार नाही यामुळे समाजमनात कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. सीमाचा हा संघर्ष कुठे संपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-