टू व्हीलर व फोर व्हीलर ची भीषण धडक तीन जागीच ठार
आर्णी तालुक्यातील घटना
येथील उडान पुलावर दुपारच्या ४ वाजताच्या सुमारास डूमनी कुरा येथील २ युवक व एक यवतमाळ येथील युवक मोटारसायकल ने आर्णी वरून यवतमाळ कडे एम एच २९ बीए १०४७ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने विरुद्ध दिशेने जात होते तितक्यात यवतमाळ वरून नांदेड कडे जाणारी एम एच २५ आर ५७३० या वाहनाला धडक दिल्याने मोटार सायकल वरील तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने अपघातात तिन ठार झाले. ठार झालेल्या
व्यक्तीचे दीपक मेश्राम ३५, संदीप अत्राम ३२ दोन्ही राहणार कुरा डूमनी व नात्तू कुमरे ४५ रा यवतमाळ असे मृतांचे नाव आहे. या.अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ॲम्बुलन्स पाठवून व या घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक नागेश जायले यांनी करून पुढील तपास पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले करीत आहे.