तिच्या वेदना सर्वांकडून दुर्लक्षित.
नऊ दिवसापासून सीमाचे आमरण उपोषण.
प्रशासनाचा दबावतंत्र
मारेगाव (कैलास मेश्राम)
ठाणेदार च्या दडपशाही व अन्याय विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यासमोर करणवाडी येथील सीमा नामक अपंग महिला भर पावसात उपोषणाला बसली आहे.वैद्यकीय अहवाला नुसार तिची प्रकृती अधिक चिंताजनक होत आहे.मात्र अन्याय विरुद्ध ती मागे हटायला तयार नाही.
करणवाडी येथील सिमा नामक महिला च्या पायावरून 2 वर्षापूर्वी ट्रक गेला होता.या भीषण अपघातात तिचे दोन्ही पाय गुढघ्यापासून कापून टाकण्यात आले.अतिशय बिकट परिस्थितीत ती हलाखीचे जीवन जगत आहे.अश्या कठीण प्रसंगी ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी खोट्या कार्यवाहीत तिला गोवले.अतिशय अश्लील शिव्या दिल्या व ठाण्यात जमानत होऊन सुद्धा बेकायदेशीर अटकाव करून ठेवला.याविरोधात तिने न्याय मिळावा म्हणून भर पावसात 5 जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले.उपोषण दडपण्यासाठी प्रशासन कुटील डाव खेळत आहे. उगीच ठाणेदार चे समर्थन करण्याचे काही तथाकथित समाजसेवक निवेदन देत आहे.पोलीस उपोषण सोडावे म्हणून दबाव टाकीत आहे.काही मोजके भ्रस्ट व उचले लोक चिरीमिरी घेऊन त्यांना साथ देत आहे.मात्र या प्रकाराने सीमा खचली नाही.अपंग महिला असूनही अश्या उचलेगिरी करणार्याविरुद्ध ती एकटीच खंबीरपणे लढा देत आहे.राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे.नऊ दिवसापासून उपोषण मुळे सीमाची प्रकृती अधिक नाजूक झाल्याचे यवतमाळ मेडिकल कालेज ने अहवाल दिले आहे.यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली आहे.तर सिमाला न्याय मिळावा यासाठी आता गावकरी देखील सज्ज झाले आहे.