पुणे जिल्हा बिरसा क्रांती दल संघटनेचा कामाचा धडाका सुरुच
प्रतिनिधी आशिष आढळ
पुणे वार्ताहर ..पुणे जिल्हा बिरसा क्रांती दल यांनी काल दिनांक.२०-०७२०२१ रोजी माळीण येथील दुर्घटनेतील बेघर झालेल्या आदिवासी कमल जनार्दन लेंभे यांना घर व सांसारिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे,मा विभागीय आयुक्त पुणे,मा निवासी उपजिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात
आले, तसेच मा शिक्षण संचालक सो उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना ही महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील १००% प्राध्यापक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले व प्राध्यापक आंदोलन स्थळी जाऊन बिरसा क्रांती दल संघटनेचे पाठिंबा पत्र देऊन पाठींबा जाहीर केला
यानंतर पुणे TRTI आयुक्त डॉ राजेंद्र भारुड( IAS) यांची सदिच्छा भेट घेतली या सर्व ठिकाणी बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा अध्यक्ष,मा श्री दत्तात्रय कोकाटे सर , मा श्री चिंधू आढळ पुणे जिल्हा बिरसा क्रांती दल संघटक, मा श्री सुरेश वाळकोळी अध्यक्ष आंबेगाव तालुका, मा श्री संदिप भवारी कोषाध्यक्ष आंबेगाव तालुका ,व सदस्य मा श्री संजय मेचकर उपस्थित होते