खेड तालुक्यातील आव्हट गावातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे रुपांतर झाले,२० फूट वडयात..
पुणे खेड प्रतिनिधी
आशिष आढळ
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पडणाऱ्या पावसाने भातखाचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खेड तालुक्यातील
आव्हट गावातील शेतकरी सोमनाथ बुरूड या आदिवासी बांधवांचे भातखाचराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांनी स्व, खर्चाने बांधलेल्या विहीरीचे रूपांतर २० फूट वडयात, नाल्यात झाले असून खूप आर्थिक नुकसान झाले आहे.तरी शासनाने तातडीने पंचनामे करून आदिवासी पश्चिम विभागातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचे भातखाचराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या सर्वांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी सोमनाथ बुरूड यांनी केली आहे.