मारेगाव पोलीस ठाण्यात अपघाती डिटेन५६ वाहनांचा होणार लिलाव
लिलावात नागरिकांनी सहभागी व्हावे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे आवाहन
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षा पासून अपघातात डिटेन असलेल्या ५६ वाहनाचा जाहीर लिलाव पोलीस स्टेशन मारेगाव येथे ६ ऑगस्ट रोज शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता होणार असून .
मारेगाव परिसरातील वेगवेगळ्या अपघातातील ५६ वाहने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये डिटेन केलेली आहे. पोलीस स्टेशन मध्ये जमा असलेल्या ५६ वाहन मालकांनी आजपरंत आपला मालकी हक्क सिध्द केलेला नाही. पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेल्या यादीतील वाहने ज्या कोण्या गाडी मालकाची असेल त्यांनी आपल्या वाहनाचे मूळ कागदपत्रे दिनांक ३ ऑगस्ट रोज मंगळवार पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये सादर करून वाहने आपल्या ताब्यात घ्यावे.अन्यता त्यानंतर सदर वाहनांवर कोणीही आपला मालकी हक्क दाखविल्यास तो ग्राह्य धरल्या जाणार नाही.असेही आवाहन ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी केले आहे