बाहा गोऱ्या डोंगरावर वृक्षारोपण
मोलगी( प्रतिनिधी ) रविंद्र पाडवी
कुलस्वामिनी देवमोगरा मातेचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आदिवासींचे श्रद्धा स्थान असलेल्या बाहा गोऱ्या डोंगरावर आज वृक्षा रोपण करण्यात आले या वृक्षा रोपणासाठी रोपांची मदत भगदरी येथील चंद्रसिंग पाडवी यांनी केली होती त्यांनी या ठिकाणी वृक्षा रोपण करण्यासाठी पाचशे रोपांची मदत केली असून त्यात हिरडा चारशे व कडुलिंब शंभर अशी रोपांची संख्या होती.
बाहा गोऱ्या देवस्थान ठिकाण हे जुनवाणीच्या दक्षिणेत व वालांबा गावच्या मध्यवर्ती असलेले परिसरातील उंच डोंगर असून या ठिकाणी दिवाळीच्या वेळेस मोठया संख्येने भाविक या ठिकाणी येऊन आपल्या शेतीतील अन्न,जनावरे,आरोग्य धनसंपदे साठी पूजा करतात. बाहा गोऱ्याला सर्व देवांचे राजा म्हणून ही ओळखले जाते.परंतु हे ठिकाण पुर्णतः मोकळे असल्याने या डोंगरावर झाडे लावण्याची संकल्पना जुनवाणी,खालपाडा,साकलीऊ मर,येथील लोकांनी व मोलगी परिसर सेवा समितीने केली आहे.त्याच संकल्पनेतून या ठिकाणी वृक्षा रोपण करण्यात आले.
या वृक्षा रोपणा साठी जुनवाणी गावातील ओल्या पाडवी, दमण्या पाडवी,दोंग्या पाडवी, रामा पाडवी, कांड्या वसावे, वसन पाडवी,भिका पाडवी, मनेश पाडवी, आपसिंग पाडवी,कांतीलाल पाडवी,संजय पाडवी,सुनील,प्रवीण,शिवाजी,वेस्ता,व चंद्रसिंग पाडवी या सर्व्यांच्या सहकार्याने बाहा गोऱ्या वर वृक्षा रोपण करण्यात आले.