ग्रामपंचायत दाभा मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची ग्रामस्थांनी मागितलेल्या चौकशीस प्रशासनाच्या वतीने विलंब का ?
सचिन मेश्राम
खूप दिवसा पासुन लोक चर्चेत असलेल्या बाभूळगाव पंचायत समिती मधिल सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत दाभा येथे गेल्या पंच वार्षिक मधील माजी सरपंच व कार्यरत असलेले सचिव तथा ग्राम विकास अधिकारी ए.बी. राठोड यांनी केलेल्या भ्रष्ट्राचार ची सखोल चौकशी करण्यात यावी असे निवेदने दिनांक १७ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना ग्रामस्थांनच्या मार्फत निवेदन देण्यात आले होते नंतर या निवेदन चे शुद्धीपत्र दिनांक २७ मे २०२१ रोजी २२३ गावकऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन शुद्धीपत्र निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना दिले परंतु अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. त्यांनतर पुन्हा एकदा स्मरणार्थ पत्र दिनांक ०७ जून २०२१ रोजी देण्यात आले होते.
या स्मरणार्थ पत्राच्या निवेदना मध्ये दाभा ग्रामपंचायत मध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्ट्राचाराची संपूर्ण कामाची सखोल चौकशी जिल्हा भ्रष्ट्राचार निर्मूलन समिती मार्फत करण्यात यावी असे या स्मरणार्थ पत्र मध्ये मागणी केली आहे. या बद्दल जिल्हाधिकारी साहेब काय निर्णय घेतील या कडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.