मारेगाव साई मित्र परिवार तर्फे२३जुलै रोजी महारक्तदान शिबिराचं आयोजन
सचिन मेश्राम
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन मागील ९ वर्षांपासून मारेगाव साई मित्र परिवार तर्फे
गुरूपोर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन जगन्नाथ महाराज मंदिर येथे (राष्ट्रीय महाविद्यालय मारेगाव) करण्यात येत असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी गुरूपोर्णिमा निमित्ताने शुक्रवार रोज २३ जुलै रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले आले आहे. आम्हा सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात असल्याचे साई मित्र परिवाराच्या पदधिकारी यांनी सांगितले.