Type Here to Get Search Results !

भाजी विक्रीची गाडी लावण्यावरुन युवकावर चाकुन प्राणघातक हल्ला

भाजी विक्रीची गाडी लावण्यावरुन युवकावर चाकुन प्राणघातक हल्ला

         यवतमाळ शहरातील घटना
   
यवतमाळ/प्रतिनिधी

यवतमाळ दि.१२ -:भाजीपाला हातगाडी लावण्याच्या वादातून एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला करीत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शहरातील अप्सरा टॉकीज परिसरातील लाहोटी बिछायत केंद्राजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अभय धोतरकर वय २३ वर्ष रा. बांगर नगर, यवतमाळ असे जखमीचे नाव आहे.
शहरातील बांगर नगरातील अभय धोतरकर हा अप्सरा टॉकीज ते स्टेट बँक या मार्गावर हातगाडी लावून भाजीपाल्यांचा व्यवसाय करतो. काही दिवसापूर्वी या परिसरात हातगाडी लावण्या वरून त्याचा मनवर बंधू सोबत वाद झाला होता. त्यावेळी वडिलांनी अभयची समजूत काढून वाद मिटवला होता. शुक्रवारी अभय याने आपली भाजीपाल्याची हातगाडी लावली नव्हती तसेच तो दिवसभर घरीच होता. सायंकाळच्या सुमारास अभय हा मित्र शेख तौफिक याच्यासोबत भाजीपाला व्यवसायाबाबत चर्चा करण्यासाठी अप्सरा टॉकीज परिसरातील लाहोटी बिछायत केंद्राजवळ गेला होता.यावेळी दोघेही मित्र चर्चा करीत असतांना चिंटु मनवर, लखन मनवर, दादु मनवर आणि सोबत एक तरूण असे चौघे त्या ठिकाणी आले. दरम्यान अभय सोबत वाद घालू लागले. तुला सांगितल्यानंतर देखील तू स्टेट बँक चौकात गाड़ी का लावतो म्हणून शिविगाळ केली. यावेळी अभय याने त्या चौघांना मी माझी हातगाडी सन २०१२ पासून त्या ठिकाणी लावत असल्याचे सांगितले. यावेळी चिंटू मनवर याने धारदार चाकू काढून तुला जिवंत सोडत नाही म्हणत अभय याच्या कमरेवर सपासप वार केले. तसेच इतर तिघांनी लाथाबुक्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर चौघे त्या ठिकाणाहून निघून गेले. यावेळी मित्र शेख तौफिक याने अभयचा भाऊ अजय याला याबाबत माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या अभयला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी गिरीश धोतरकर वय ५१ वर्ष यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चिंटु मनवर, लखन मनवर, दादु मनवर याच्यासह एका साथीदारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्यांचे विरुध्द भादंवी कलम ३०७,३२३,५०४,३४ नुसार
गुन्हे नोंद करुन तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies