Type Here to Get Search Results !

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेबांची जयसने घेतली भेट व दिले निवेदने.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेबांची जयसने  घेतली भेट व दिले निवेदने.

आज दि. ११ जुलै २०२१,रविवार रोजी *जय आदिवासी युवा शक्ती - JAYSमहाराष्ट्र प्रदेश च्या वतीने *मा. ना. नरहरी झिरवळ साो.* (उपाध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य) यांची त्यांची निवासस्थानी भेट घेण्यात आली.
   यावेळी विविध समस्यांनवर साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली व येत्या दोन/तीन दिवसात मुंबई ला भेट देण्यास सांगितले. निन्म विषयांवर चर्चा करून व निवेदन देण्यात आले. 
*१) पं. दीनदयाळ उपाध्याय स्वंयम योजना व आदिवासी वसतीगृह योजना यांची थकित  DBT रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांना देण्यात यावे.*
अनुसूचित जमातीच्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इ. १२ वाी नंतरच्या उच्च शिक्षणाकरिता भोजन निवास व शैक्षणिक साहित्य साठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण - DBT करण्याबाबत "पंडित दीनदयाल उपाध्याय -  स्वयंम योजना"  15 ऑक्टोंबर 2016 पासून सुरू करण्यात आली. मात्र स्वयम योजनेसह वसतिगृहच्या लाभार्थ्यांना मोठ्या स्वरुपात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चालू शैक्षणिक वर्षाची तर सोडाच, मात्र ज्या विद्यार्थ्यांना  गेल्या शैक्षणिक वर्षात लाभ मिळालेल्या त्या विद्यार्थ्यांची तर आज दयनीय अवस्था आहेत. गेल्या वर्षाची थकीत रक्कम आजही न मिळाल्यामुळे आर्थिक तणावात  विद्यार्थी असलेला दिसायला मिळत आहे. त्याचे मानसिक, शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून लवकरात लवकर थकित DBT देण्यात यावे. 

*२. वसतीगृह प्रवेश अर्ज सादर केलेल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १००% प्रवेश देण्यात यावा.*
       वसतिगृहात प्रवेश भेटेल या आशेने विद्यार्थ्यानी स्वयंम योजनेचे सुद्धा फॉर्म भरलेले नाहीत आणि वसतिगृहात जागा शिल्लक नाहीत म्हणून त्यांचे प्रवेश नाकारन्यात येत आहे. तसेच स्वयम योजनेचे लाभ तालुका पातडिवर फक्त प्रोफेशनल कोर्सच्याच विद्यार्थ्यांना घेता येणार मग बाकी विद्यार्थी जातील कुठे?  म्हणून वसतिगृहात प्रवेशासाठि अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे. 

*३.अनुसूचित जमाती संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अभिछात्रवृत्ती देण्यात यावे.*
अनुसूचित जमाती विद्यावाचस्पती संशोधक (PhD Scholar) विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता  आदिवासी विभागातर्फे कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. राष्ट्रीय स्तरावर  केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती अभिछात्रवृत्ती (NTFS) मिळते पण काही किचकट अटींमुळे महाराष्ट्रातील नगण्य अनुसूचित जमाती संशोधक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो व त्याचे प्रमाणही नगण्य आहे. ज्या संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती अभिछात्रवृत्तीचा लाभ मिळत नाही त्यांना बर्‍याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि बर्‍याचदा काही विद्यार्थी संशोधन प्रकल्प अर्ध्यावर सोडून देतात. म्हणून भविष्यात विद्यार्थी अश्या समास्याना समोर जावू नयेत म्हणून आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अभिछात्रवृत्ती देण्यात यावे. 

४. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांच्या विविध सुधारणा बाबत.*
      अर्थसंकल्पीय अधिवेशन - मार्च २०२१ च्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी दि. १० मार्च २०२१ ला अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत मा. आ. सुरेश धस यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) च्या १५० कोटी रक्कमेबाबत  अफरातफरेची पुराव्यासह माहीती विधान परिषदेत उपस्थित केली होती. यात तत्कालीन आयुक्त यांनी १५० कोटी रुपये त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या NGO ना कौशल्य विकास प्रशिक्षण च्या नावे परस्पर दिल्या बाबतीत चौकशी करून दोशीनवर कार्यवाही करन्याच्या मागणी  सह 
 ५. प्राध्यापक भरतीसाठी 100 बिंदू नामावली विभागवार आरक्षण धोरण कायम ठेवन्यात यावे६पालघर पेसा कायदा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.*
७.औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी च्या गायराण जमिनवाद व  साक्री तालुक्यातील घरकुल संदर्भात* सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अमित भाई तडवी, प्रदेश महासचिव श्री जगन्नाथ (जतीन) वरठा सर, प्रदेश सहसचिव श्री प्रो. बबलू गायकवाड सर,  प्रदेश प्रवक्ता श्री दिनेश सी. पावरा, उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मफतलाल पावरा सर, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री प्रसाद पराड जी व संपूर्ण जिल्हा टीम, नाशिक जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) भगवान खिल्लारी, शहरी शरद पोटकुले व नाशीक जिल्हा टीम, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री बापूसाहेब गोरे व टीम, जळगाव जिल्हा अध्यक्ष सुल्ताल तडवी व टीम, साक्री तालुका कार्यकारी अध्यक्ष सुरेश मालचे व टीम सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, तालुक्यातील जयस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies