घरात शिरले पावसाचे पाणी/ अडणी (गट) ग्रामपंचायतचे नियोजन शून्य
प्रतिनिधी/योगेश देठे
शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर अडणी परिसरातील असलेल्या मोठा पोड आदिवासी वस्तीत येथे पावसाळी वाहिन्या, नाल्या नसल्याने आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांच्या घरत पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजन केले नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून अडणी (गट ) ग्रामपंचायत ने ठिकठिकाणी पावसाळी वाहिन्या, नसल्याने नागरीकाच्या घरात तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नियोजन केले असते शनिवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर अडणी मोठा पोड परिसरातील घरांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली होती. रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या जाण्या येण्या करता रस्ता नसल्याने नागरीकांचे बेहाल होत असून ज्या नागरीकाच्या घरात पाणी शिरले अनाज जिवन उपयोगी वस्तू खराब झाल्याने नागरिकांनी आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे..