चाकडू येथे कोविड लसीकरण लसीकरण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद.
कोविड-१९ चा वाढताप्रादुर्भाव तसेच तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून उपकेंद्र कोडीद अंतर्गत चाकडू येथील जि.प.शाळेत कोवीड_१९चे लसीकरण(Vaccination) संपन्न झाले.
ह्यावेळी पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे डॉ.नीलिमा देशमुख ह्यांनी सदर शिबिराचे उद्घाटन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.लस घेतल्याने कोरोना झाल्यावर तुम्हाला लक्षणांची तीव्रता कमी राहील किंवा आरोग्याची जोखीम कमी होईल, लस घेतल्यावर आपल्याला कोरोना होण्याचे प्रमाण अत्यल्प व लक्षणाची तीव्रतकमी असते हॉस्पिटलची गरज पडत नाही. असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.
ह्यावेळी कोडीद उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, आरोग्य सेवक ए.पी.नेटके व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका ह्यांनी नियोजन केले व सदर ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण यशस्वी संपन्न केले.
ह्या शिबिराचे यशस्वी नियोजन चाकडू गावचे नवनिर्वाचित सरपंच सुनील मुखडे, सुनील पावरा, चंद्रसिंग पावरा सर, दिवानसिंग पावरा तसेच युवा सेनाचे गावातील सर्व तरुणांनी खूप मेहनत घेऊन सदर शिबिर यशस्वी पार पाडले.