नवनियुक्त मंडळ अधिकारी गणेश सोनवणे यांचा तलाठ्यांच्या वतीने सत्कार....
पैठण येथे मंडळ अधिकारी म्हणून नवीन नियुक्त झालेले मंडळ अधिकारी गणेश सोनवणे यांचा सत्कार तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वतीने करण्यात आला.
पैठण येथील प्रभारी मंडळ अधिकारी शैलेश जोशी यांनी नुकताच पदभार सोनवणे यांच्या कडे सोपवला असून मंडळ अधिकारी गणेश सोनवणे पाच सजाचे कामकाज हाताळणार आहे.
यावेळी कावसांन जुने सजेचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे, पैठण सजेचे तलाठी भैरवनाथ गाढे, दादेगाव जहाँगीर चे तलाठी सुरजसिंग राजपूत, चांगतपुरी चे तलाठी केंद्रे, वडवाळी सजेचे तलाठी निकम यांच्या सह कोतवाल दिपक नवगिरे, योगेश रावस, शिवाजी खेडकर, वडवाळी चे पोलीस पाटील नवनाथ बर्डे आदींनी नवनियुक्क्त मंडळ अधिकारी गणेश सोनवणे यांचा सत्कार करून अभिनंदन केले....