एका पुराने पतीला हिरावले; दुसऱ्या पुराने शेतात आले दगड धोंडे; पुसद तालुक्यातील विमला जाधव या महिलेची व्यथा
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात नुकत्याच झालेल्या ढगफुटीने पारवा बुद्रुक हे गाव नव्याने चर्चेत आले. गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माती झाली. तर 16 वर्षपूर्वी आलेल्या पुरामुळे झालेले नुकसान बघून विमलाबाई
जाधव यांचे पती भाऊराव जाधव या शेतकऱ्याने झालेल्या ढगफुटी झालेल्या शेतामध्येच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने विमालबाईच्या आठ एकरातील शेतात नाल्यातील दगड धोंडे भरले. हताश झालेल्या महिलेसमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने ताबडतोब मदत करावी अन्यथा पतीप्रमाणे आपल्यालाही आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी विमलाबाई जाधव यांची मानसिकता झाली आहे