राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री नन्नुभाऊ उध्दवराव कोडापे यांची नियुक्ती
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा स्तरीय महारॅली व चरनबद्द आंदोलनाचा तिसरा टप्पा दिनांक 29 जुलै 2021 ला संपूर्ण भारतातील 550 जिल्हयात कोविड 19 च्या नियमांचे पालन करुन शांतता पूर्ण वातावरणात मा . जिल्हाधिकारी यांचे मार्फत देशात आदिवासींवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार विरोधी मागण्यांचे निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले .
आंदोलना दरम्यान यवतमाळ जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात आली .
जिल्हाध्यक्ष पदी श्री हुसेन भाऊ
त्याच प्रमाणे राळेगाव तालुका अध्यक्ष पदी श्री शंभु भाऊ पेंदोर ,
झरी जामणी तालुका अध्यक्ष श्री शेषराव सोयाम , मारेगांव तालुका अध्यक्ष पदी श्री राहूल भाउ आञाम यांची नियुक्ती करण्यात आली .
सदर नियुक्त्या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद केंद्रीय कार्यकारीणी दिल्ली चे सदस्य मा . श्री कृष्णाजी किनाके यांच्या हस्ते करण्यात आल्या .
नवनियुक्त पदाधिकारी यांचेवर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत .
मा .श्री विजयराज सेगेकर आणि मा . श्री कैलास मडावी सर यांच्या मार्गदर्शनाने या पुढील सामाजिक वाटचाल उत्तम रित्या सुरू राहील अशी ग्वाही नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिली .
आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य आदिवासी पुरुष व महीला उपस्थित होते .