चंद्रपूर शहरात गोळीबार
चंद्रपुर - चंद्रपूर शहरातील रहदारीचा असलेल्या परिसरातील रघुवंशी काम्पलेक्स या बिल्डिंग मध्ये बुरखा घालून आलेल्या युवकाने एका युवकावर गोळीबार केल्याची थरारक घटना आज दुपारी घडली.
यात एक युवक जखमी झाला आहे, त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेत बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार जखमी झाला आहे, जखमीला उपचारासाठी नागपूर नेल्याची माहिती प्राप्त झाली असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी नांदेडकर व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे व चमू दाखल झाले असून घटनेचा तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.