Type Here to Get Search Results !

मंदाणे येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला कठोर शिक्षा करा: बिरसा फायटर्सची मागणी

मंदाणे येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला कठोर शिक्षा करा: बिरसा फायटर्सची मागणी

रत्नागिरी: अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला कठोर शिक्षा करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष  बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हाधिकारी नंदुरबार,पोलीस अधिक्षक नंदुरबार,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. अशीच निवेदन मनोज पावरा राज्याध्यक्ष महाराष्ट्र,राजेंद्र पाडवी महासचिव बिरसा फायटर्स,संतोष वळवी तालुका अध्यक्ष शहादा यांनी प्रशासनाला  पाठवली आहेत. 
          निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दिनांक 09 जुलै 2021 रोजी एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा पैशाचे आमीष दाखवून  विनयभंग करत जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो.फिर्यादी वडीलाच्या सांगण्यावरून,मुलीचे वडील मजूरीचे पैसे मागण्यासाठी गावात गेले होते व मुलीची आई धुणीभांडी करण्यासाठी गावात गेली असता पीडीत 10 वर्षाची मुलगी त्याच्या लहान भावंडांना सांभाळण्यासाठी घरीच होती.तेव्हा पैशाचे आमिष दाखवून संशयित आरोपी विश्वास रूपचंद पाटील रा.मंदाणे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घडलेला प्रकार पिडीत मुलीने आईला सांगितला.त्यावरून मुलीच्या वडीलांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीला अटक झाली असून भा.द.वि.कलम 354( अ)1,2,4 अंतर्गत ,अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम,लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अन्वये (पोक्सो)11(1),(2),(6)कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी समाजावरील मुलींवर व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच आहेत. म्हणून अशा घटनेसंबंधित आरोपींना कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे,जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल. तरी सदर घटनेतील संशयित आरोपीला कायदेशीर कठोर शिक्षा करण्यात यावी.हीच नम्र विनंती. अन्यथा आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा आंदोलनाचा इशारा सुद्धा सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांनी प्रशासनाला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies