Type Here to Get Search Results !

अखेर पिवरडोल येथील नरभक्षक वाघाला केले बंदिस्त १८वर्षीय युवकाला केले होते ठार

अखेर पिवरडोल येथील नरभक्षक  वाघाला  केले  बंदिस्त १८वर्षीय युवकाला केले होते ठार 

                  यवतमाळ
जिल्हा प्रतिनिधी | रोहन आदेवार

झरी तालुक्यातील पिवरडोल येथील : नुकतेच मिळालेल्या माहिती नुसार पिवरडोल१८वर्षीय अविनाश गुरूनुले हा युवक  शुक्रवारी दि.९जुलै रोजी सांयकाळी अंदाजे ७:३०वाजता सुमारास गावा शेजारी शौचास गेलेला असताना दबा धरून बसलेल्या  वाघाने अविनाश याला फरकळत शेतामध्ये नेवून  ठार  केल्यांची घटना शनिवारी दि. १०जुलै रोजी सकाळीच ही घटना उघकीस आली होती.  गावाकऱ्यांनी आक्रमक भुमिका घेत लेनगुरे परिवाराला आर्थिक मदत आणि घरातील व्यक्तीला नौकरी व गावाच्या भवताल तार कुंपणाची सुरक्षा करून दिल्याशिवाय पंचनामा व अंत्यसंस्कार करणार नाही अशी मागणी लावून धरल्याने   वनविभागा कडून लेखी आश्वासन दिल्या मुळे  अविनाश वर अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने वाघाला पकडण्यासाठी अमरावती नागपूर येथील पथकाला   बोलून आज दि.१२जुलै रोजी पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन लगातार सुरु होते. त्यामुळे गावाकऱ्यात काहीसे समाधान दिसत असतांना आज पुन्हा काही वाघाचा घुमजावं झाल्याने धावा धावा वाघ आला वाघ! म्हणून गावाकऱ्यांनी वाघाच्या दिशेने धाव घेतली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा पिवरडोल येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दिनांक ११ जुलै च्या पहाटे पासून पांढरकवडा, पाटण, बोरी सर्कल मधील वनविभागाचे अधिकारी पथकासहित पोचल्याने  येथील वाघाला पडकण्याचे काम सुरु होते. मात्र, वाघ कोणाच्या हाती लागत नसून परिसतील दिसेल त्यावर वाघ हल्लाबोल करीत असल्याचे समजते. ज्या दिवशी अविनाश ला वाघाने ठार केले त्याच दिवशी,च्या दरम्यान एका गायीचा ही वाघाने फडशा पडल्याचे चर्चा आहे. तसेच या परिसरात एक नाही तर तब्बल सहा वाघ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाघ्याच्या मुक्त संचारामुळे येथील शेतकरी शेतमजूरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून जुनोनी पिवरडोल शेतशिवारातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून जीव मुठीत घेऊन दहशतीखाली जिणं लोकं जगत आहे.
        
त्यामुळे या परिसरातील वाघ पकडणे अतिशय गरजेचे झाले आहे, नाहीतर येथील वास्तव्यास असणाऱ्यांचे हेच वाघ आजुबाजूच्या लोकांचे  जिव घेतल्याशिवाय  राहणार नाही असे, येथील शेतकरी शेतमजूर व नागरिकांकडून बोलल्या जात आहे. रंगा नावाने संबोधले जाणाऱ्या वाघाला पकडण्यात आल्याने दोन दिवसापासून येथे पिवरडोल परिसरातील रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला रंगा नावाच्या वाघाला पकडण्यात आज यश  आल्याने काही  प्रमाणात असेना पिवरडोल व आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना सध्यातरी सुटकेसा श्वास घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies