प्राध्यापक भरती आंदोलनाला बिरसा क्रांती दल महाराष्ट्र संघटनेचा पाठिंबा
प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील १००%पदभरतीप प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासंदर्भात १९ जुलै पासून प्रस्तावित असलेल्या पुणे नागपूर राज्यव्यापी आंदोलनास बिरसा क्रांती दल महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
आपल्या संघटनेच्या वतीने मिळालेल्या पत्रास अनुसरून दि.१९जुलै २०२१ पासून खालील मागण्यांसाठी आपल्या संघटनेकडून पुणे, नागपुर सह राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे
१) अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे १००% तात्काळ भरण्यात यावीत
2)CHB पध्दत बंद करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या डॉ धनराज माने समितीची कार्यवाही तात्काळ सुरू करुन निहित कालावधीत अहवाल सादर करावा
३) पुर्णवेळ प्राध्यापक पद भरल्यानंतर शिल्लक कार्यभारासाठी अर्धवेळ प्राध्यापक पदाची निर्मिती करण्यात यावी.
वरील मागण्यांच्या अनुषंगाने आपल्या प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन संघटनेच्या आंदोलनास बिरसा क्रांती दल या आमच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा देत आहोत.असे बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री दसरथ मडावी साहेब यांनी दिनांक १४जुलै रोजी जाहीर केले आहे