राष्ट्रीय आदिवासी एकता परिषेच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करून
तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
सचिन मेश्राम
संपूर्ण भारत देशात आदिवासींच्या समस्या निर्माण करण्यात येत असून आदिवासींची चालीरिती, आदिम संस्कृती असुन सुद्धा हिंदूत गणल्या जाणे व वैदीक धार्मिक संस्कृती थोपवून आदिवासींची ओळख मिटविण्याचा , परम्परागत हक्क, संवैधानीक कायदेशीर अधिकार संपविण्याचा कुटील डाव शासनाकडून होत आहे. आदिवासींची सामुहिक हत्या करुन जमीनीत पुरणे, आदिवासींना वनवासी संबोधने, आदिवासी क्षेत्रात रस्ते, पाणी, विज, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा व मुलभूत सुविधेपासून वंचित ठेवणे, विकासाच्या कारणास्तव आदिवासींना जल, जंगल, जमीनी पासून बेदखल करुन निर्दोष आदिवासींना नक्षलवादीचा ठपका ठेवून मारले जात असुन. धरने, अभयारण्य, महामार्ग सैनिकी छावन्या उभारुन आदिवासींना त्यांच्याच क्षेत्रातुन बेदखल करणे, वन्यप्राण्यांच्या शिकारी प्रकरणी आदिवासी समाजावर वर खोटे गुन्हे दाखल करणे आदिवासीं समाजावर अन्याय अत्याचार करुन त्यांना माणुस म्हणुन नाकारणे अश्या अनेक आदिवासींच्या समस्यांच्या निराकरणा करिता व सवैधानिक हक्क अधिकारासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या वतीने देशव्यापी शृंखलाबद्ध आंदोलनाचा दुसरा टप्पा तालुका स्तरावर धरना व निवेदन आज मारेगाव येथे धरणे आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात सहभागी संघटना क्रांतीविर शामादादा कोलाम संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेत, ग्राहक प्रहार संघटना, भारत मुक्ती मोर्चा, या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला यावेळी उपस्थित हुसेन ठोबरे, राहुल आत्राम,सुरेश मेश्राम, तुळशीराम कुमरे, सुमित गेडाम, रशीद टेकाम, रूपेश आत्राम, चंद्रशेखर आत्राम प्रभाकर आत्राम नामदेव आत्राम तुळशीराम आत्राम, बळीराम आत्राम अमृत मेश्राम, संतोष नागभीडकर या सह अनेक संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते.