ऍड. हुमैरा शरीफ यांची मारेगाव तालुका कॉंग्रेस अल्पसंख्याक महिला अध्यक्षपदी निवड
सचिन मेश्राम
मारेगाव (१५ जुलै ) :- ऍड. हुमैरा शरीफ यांची कॉंग्रेस अल्पसंख्याक महिला तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.स्व. इंदिरा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विचाराला पेरीत होवून मारेगाव कॉंग्रेसचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर
त्या म्हणाले की मारेगाव तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला घरा-घरांपर्यंत पोहोचून पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न करणार तसेच त्यांनी सांगितले की ,” प्राधान्य मुख्यत: महिला सक्षमीकरणाद्वारे पक्षाला बळकट करावे लागेल असे स्पष्ट मत व्यक्त केले
आमदार वामनराव कासावार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नरेंद्र ठाकरे ,जि .प. सदस्य अरुणा खंडाळकर ,तालुका जिल्हा सरचिटणीस खालिद पटेल ,दुष्यंत जयस्वाल बद्रुद्दिन काजी युसुफ शेख यासह सर्व ज्येष्ठ नेते यांना नियुक्तीचे श्रेय देण्यात आले.