चिंचमंडळ येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना
प्रतिनिधी/ पंकज नेहारे
मारेगाव : तालुक्यातील चिचंमंडळ येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दि.गुरूवार दि१५जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळाफास घेतल्याची घटना उघकीस आली.
मयत युवकाने आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे .
विकास मारोती तोडासे (वय २६, रा.चिचंमंडळ, ता. मारेगाव) यांनी आज दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आले. विकास यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगी व मुलगा असा आपत्य परिवार पाठी मागे आहे.