शंकरराव मडावी यांची अखिल भारतीय विकास परिषेदेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
सचिन मेश्राम
मारेगाव : शंकरराव मडावी यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मडावी हे बिरसा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष व सेवा निवृत्त तहसीलदार असुन समाजसेवक असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नरेश गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली दि. जुलै १४ रोज बुधवारला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेदेच्या कार्यालयात निवड करण्यात आली आहे . यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष सुमित सुनिलराव गेडाम तालुका उपाध्यक्ष राजु गेडाम यांची प्रमुख उपस्थित होती.उपस्थित पदाधिकारी यांनी मडावी यांची आखिल भारतीय विकास परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. मडावी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.