१०१रक्तदात्यांनी केले रक्तदान साई मित्र परिवाराद्धारे मारेगाव येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव : गुरूपोर्णिमा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी साई मित्र परिवार तर्फे सदगुरु जगन्नाथ बाबा मंदिर येथे आज दि.२३जुलै रोजी सकाळी९ ते४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले यामध्ये वसंतराव नाईक मेडिकल काँलेज रक्तपेढी यवतमाळ यांच्या टीमने १०१ रक्त संकलीत केले. साई मित्र परिवार मागील९ वर्षांपासून रक्तदान शिबीराचे गुरूपोर्णिमेच्या दिवसी आयोजन केले जाते. यासोबतच साईबाबा फोटोची सजावट करून यावेळी काकड आरती करण्यात आली असुन व महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला असुन मारेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या हस्ते १०१रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
साई मित्र परिवार मारेगाव संयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.