शेतकर्यांना भातखाचारांचे पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत द्या बिरसा क्रांती दलाची मागणी
पुणे जिल्हा प्रतिनिधी आशिष आढळ..
पुणे जिल्ह्यातील.. खेड तालुक्यातील पचिम आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारयासह पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून या आदिवासी भागात पावसाळ्यात भात ,नाचणी ही एकमेव पिके आदिवासी बांधव घेत असतात अगोदरच पावसाअभावी भात ,नाचणी पिकाचे मोठया प्रमाणात उन्हामुळे नुकसान झाले असून आता अचानक पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतकर्यांच मोठे नुकसान झाले आहे लावलेल भात नाचणी नदी नाल्यात पावसानेवाहुन गेले आहे खुप मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा सचिव शशिकांत आढारी, जिल्हा संघटक चिंधूआढळ यांनी खेड तहसिलदार ,कलेक्टर यांना ईमेल द्वारे निवेदन देऊन मागणी केली आहे