ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनर ठार
यवतमाळ : यवतमाळ-चंद्रपूर या राज्य महामार्ग क्रमांक चार वर ट्रक झाडावर आढळल्याने झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही ठार झाले आहेत. चंद्रपूरहून यवतमाळच्या दिशेने लोखंडी पोल घेऊन निघालेल्या ट्रकचा टायर फुटून अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला. यात ट्रकचालक व क्लिनर दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये फसले. यात
दोघांचाही मृत्यू झाला. अपघातात ट्रक मध्ये दोघे फसले असतानाही त्यांना वाचविण्यासाठी ५ तासात कुठलेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.ट्रँक क्रमांक एम एच ३४, बिजी५४११चालकाचे वाहनावरील नियंत्रण सोडल्यांने चालक पुरूषोत्तम ठमके वय वर्षीय ३० रा.वंधाली ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर हा जागी ठार झाला तर क्लिनर नितीन चंदुजी तलाडे रा.वंधाली ता वरोरा जिल्हा चंद्रपूर हा जागी ठार झाला असुन याघटनेचा तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.