विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने ४५ वर्षीय इसमाचा मुत्यु
प्रतिनिधी/अमरावती
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी युवक सतीश उर्फ बाबुराव भागवत (वय,४५ ) या युवकाला विद्युत लाईन असलेल्या आलेल्या झाडाच्या फांद्या तोडत असतांना फांदीतल्या विजेच्या धक्का बसल्याने सतिश याचा घटनास्थळीच दुपारी. १ वाजताच्या सुमारास जागीच मृत्यू झाला ,खोडगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील राऊत यांच्या शेताच्या धुऱ्यावरील गोंदणाचे झाड उच्च वीज वाहिनीच्या संपर्कात होतेॅ,मृतक सतीशला ओळखीच्या व्यक्तीने सदर झाडाची फांदी तोडून देण्यास फोन करून बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे,सतीश झाडावर चढला असता गोंदनच्या झाडाची फांदी जी विजेच्या संपर्कात होती,त्याला तिचा स्पर्श झाला व विजेचा धक्का बसल्याने मुत्यु झाला ,विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मुत्यु झाल्याची बातमी समजताच परिसरातील समाजसेवक सचिन गावंडे, दिपकभाऊ हंतोडकर,अमोल पटेल, श्री रामेकर व युवकांनी घटनास्थळी धाव घेतली,परंतु तोपर्यंत सतीश वर काळाने झडप घातली होती,सदरचा मृत्यू जरी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेण्याचे मार्गी प्रशासन असले तरी,खाजगी व्यक्तीवर विजेच्या संपर्कात आलेली फांदी तोडण्याची वेळ कोणामुळे आली या कारनाची चौकशी करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. पावसाळा सुरू झाल्यावरही विद्युत मंडळाला आपल्या क्षेत्राचे निगडित कामे करता येत नाहीत,म्हणून खाजगी व्यक्तींना अशी धोकादायक कामे करून नाहक जीव गमवावा लागतो असे निदर्शनास येते.