बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिल पेंदोर यांची निवड
प्रतिनिधी/आशिष अढळ
यवतमाळ: सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असणारे दिग्रस येथील अनिल नामदेवराव पेंदोर यांची आदिमांच्या चळवळीत अग्रगण्य असणार्या बिरसा क्रांती दल या संघटनेत यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.
नियोजित बिरसा मुंडा आदिवासी नागरी सहकारी पतसंस्थेच्या आढावा बैठकीत मा.दशरथजी मडावी साहेब ,राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ,बिरसा क्रांती दल यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकिला विष्णुजी कोवे,किरण कुमरे,शरद चांदेकर,देवानंद सोयाम ,संगित पवार,रमेश मडावी,अतुल कोवे,संजय मडावी हजर होते.
नियुक्तीचे श्रेय डी.बी.अंबुरे,रंगरावजी काळे,विष्णुजी कोवे,प्रा.वसंत कनाके,प्रा.कैलास बोके,संगित पवार ,नागोराव गेडाम यांना देतात .त्यांच्या निवडीमुळे दिग्रस तालुक्यात आदिवासी समाजामध्ये आनंद व्यक्त होतांना दसत आहे.