लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
प्रतिनिधी/घाटजी
घाटजी तालुक्यातील वासरी येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने दोन वर्षापासून वारंवार शारिरीक संबंधाची मागणी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केले गजाआड
घाटजी तालुक्यातील वासरी येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला घाटजी पोलिसांनी गजाआड केले आहे.वासरी येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून संशयित आरोपी सुरज महादेव कुमरे ( वय २२) राहणार वासरी ता.घाटजी याने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेव म्हणणाऱ्या आरोपी विरुद्ध अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून घाटजी पोलिसांनी संशयित आरोपी सुरज कुमरे याच्या विरूद्ध गुन्हा भा. द. वि. कलम ३७६,३५४,३५४(अ)५०६ ( 2 ),बाल लैंगिक संरक्षक कायदा 2012 प्रमाणे आरोपी ला अटक केली आहे. या घटनेचा तपास पि.एस. आय.विलास सिडाम, जमादार सुनिल केवट या घटनेचा तपास करत आहे.