विहिरीत आढळला पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह तरुणाचा
लासुर स्टेशन जवळील मौजे आरापूर शिवारात एका विहिरीत पोत्यात बांधलेले मृतदेह तरंगत असल्याची माहिती
लासूर स्टेशन : लासूर स्टेशन जवळील मौजे आरापूर शिवारात एका विहिरीत पोत्यात बांधलेले प्रेत तरंगत असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाली असता, पोलिस ठाणे शिल्लेगाव येथील पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे स्टाफसह तात्काळ घटनास्थळी पोहचले व लोकांच्या मदतीने विहिरीतील प्रेत बाहेर काढून त्याची तपासणी केली असता त्यात अंदाजे (२५ वर्ष) वयाचे तरुणाचे मृतदेह असल्याचे आढळले.
मौजे आरापूर शिवारात एका विहिरीत पोत्यात बांधलेले प्रेत तरंगत असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाली असता, पोलिस ठाणे शिल्लेगाव येथील पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे स्टाफसह तात्काळ घटनास्थळी पोहचले व लोकांच्या मदतीने विहिरीतील प्रेत बाहेर काढून त्याची तपासणी केली असता त्यात अंदाजे (25 वर्ष) वयाचे तरुणाचे मृतदेह असल्याचे आढळले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून मयत तरुणाचे नाव विकास रावसाहेब थोरात, (वय25 ) वर्षे(, रा.कदिम टाकळी, ता.गंगापूर,जि. औरंगाबाद) येथील असल्याचे समजते. मयत तरुण हा समृद्धी महामार्गाचे काम करत असलेल्या एल अँड टी कंपनीत कामावर होता. चार दिवसापूर्वी यातील मयत तरुणाची पोलिस ठाणे दौलताबाद येथे हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती. त्यास कोणीतरी अज्ञाताने ठार मारून पोत्यात घालून दगडाने बांधून विहीरीत फेकले. याबाबत आरोपी चा शिल्लेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कसोशीने तपाल करत असून मयत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन शिल्लेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदरशनखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे हे तपास करत आहे.