नव्याने बांधलेली नाली दोनच दिवसात खचली
मारेगाव नगरपंचायतने गाठला बोगस कामाचा कळस
सचिन मेश्राम
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील लाखो रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. अवघ्या दोन दिवसानंतर नाली जमिनीवर कोसळून जमीनदस्त झाल्याने . त्यामुळे मारेगाव नगरपंचायत ने बोगस कामाचा कळस गाठला असुन वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मारेगाव नगरपंचायत अंतर्गत वेगवेगळ्या निधीतून होणाऱ्या विकास कामात मोठ्या प्रमाणात बोगस कामे होत असून यास नगरपंचायत प्रशासनाचा पाठींबा असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्र १४ मध्ये नाली बांधकाम होत असल्याने या बोगस कामाकडे अद्याप नगरपंचायतचे मुख्याधिकारी, यांनी या ठिकाणी पाहणी सुद्धा केली नाही.अभियंता यांनी नालीच्या बांधकामाचे मोजमाप व बिल काढायचे असल्याने नालीचे मोजमाप सुरू असताना अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्या समोर नाली खचल्यांने किती पारदर्शक काम व भ्रष्ट अधिकारी यांची मिलीजुली भगत असल्याचे नागरिकांना बोल्या जात आहे
सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. य याठिकाणच्या नाली ही मंगळवार ला बांधण्यात आली होती. नाली दोन दिवसानंतर म्हणजेच गुरुवारी खचली. या भागातील नाली जमीनीवर कोसळल्याने नागरिका मध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त केल्या आहेत.या निकृष्ट दर्जाच्या नालीच्या बांधकामामुळे प्रभाग क्रमांक१४मधील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
या कामाकडे लक्ष देत असल्याने मुख्याधिकारी यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. या सर्व बोगस कामाबद्दल जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आता मारेगाव शहरातील नागरिकांकडून होत आहे.