Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे शुक्रवारी निधन, ब्रेन स्ट्रोकमुळे सुरेखा अनेक वर्षे होत्या त्रस्त

 
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि अनेक सिनेमे- मालिकांमधून लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे शुक्रवारी, १६ जुलै २०२२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरेखा सीकरी ७५ वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. सुरेखा यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
सुरेखा यांना दुसऱ्यांदा ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यांचे मॅनेजर विवेक सिधवानी यांनी माध्यमांना सांगितले की, ‘तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. यापूर्वी त्यांना दुसऱ्यांदा ब्रेन स्ट्रोक आला होता.’ सुरेखा सीकरी यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पहिला ब्रेन स्ट्रोक आला होता. काही दिवस इस्पितळात ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आले होते. सुरेखा सीकरी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे पदवी संपादन केली होती. ‘तमस’, ‘मम्मो’ आणि ‘बधाई हो’ या सिनेमांसाठी त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार व्यतिरिक्त सुरेखा यांना १९८९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. सुरेखा यांनी अनेक सिनेमे आणि नाटकांत काम केले असले तरी टीव्हीवरील ‘बालिका वधू’ मालिकेतील त्यांच्यादादी सा पात्राने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. प्रत्येक घरात त्यांचा चेहरा ओळखला जाऊ लागला. त्यांच्या भूमिकेचे भरपूर कौतुक करण्यात आले होते.
सुरेखा सीकरी यांचा जन्म १९ एप्रिल १९४५ रोजी दिल्ली येथे झाला. अल्मोडा आणि नैनितालमध्ये त्यांचे बालपण गेले. नंतर १९७१ मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी संपादन केली. सुरेखा यांचे वडील हवाई दलात होते आणि आई शिक्षिका होती. सुरेखाचे लग्न हेमंत रेगे यांच्याशी झाले होते. त्यांना राहुल सीकरी हा मुलगा आहे. सुरेखा सीकरी यांची सावत्र बहीण मनारा सीकरी यांचे लग्न नसिरुद्दीन शाह यांच्याशी झाले होते मनारा आणि नसिरुद्दीन यांची एक मुलगी हीबा शाह आहे. जवळपास ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सुरेखा यांनी ‘किस्सा कुर्सी का’, ‘तमस’, ‘सलीम लंगड़े पे मत रो’, ‘मम्मो’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी भरी’, ‘जुबैदा’, ‘काली सलवार’, ‘रघु रोमियो’, ‘रेनकोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दिवाना कर गए’, ‘बधाई हो’, ‘शीर कोरमा’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’ यांसारख्या अनेक नावाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त सुरेखा यांनी ‘बालिका वधू’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘सात फेरे’, ‘बनेगी अपना बात’, ‘कसर’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘जस्ट मोहब्बत’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies