बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ झरीत भाजपाचे आंदोलन
जिल्हा प्रतिनिध/रोहन आदेवार
झरी: ओबिसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज दि.6 जुलै ला झरी येथिल तहसील कार्यालयासमोर झरी तालुका भाजपाचे वतिने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करित सरकार बरखास्त करण्याची मागणी तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
ओबिसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करुन महाराष्ट्र शासनाने लोकशाहीचा मुदडा पाडला आहे. महाराष्ट्रात सरकारचे हे वर्तन तद्दन दडपशाहीचे असून केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलु न देणे हे हुकुमशाहीचे धोरण असुन अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा तमाशा तमाम महाराष्ट्राचा अपमान आहे.सरकारच्या या लोकशाही व ओबिसी विरोधी धोरणाचा निषेध करुन महाआघाडी सरकार त्वरित बरखास्त करावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. तसेच बारा आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी सतीश नाकले (भाजपा तालुका अध्यक्ष झरी), राजेश्वर गोंड्रावार सभापती पं.स. झरी जामणी), अशोकरेड्डी बोदकुरवार (भाजपा जेष्ठ नेते), लता आत्राम (प.स. उपसभापती झरी), रामभाऊ आईटवार, सचिन दुम्मनवार, सुरेश मानकर, सुरेश बोलेनवार, श्याम बोदकुरवार, सतीश दासरवार, अमोल मुत्यालवार, सोनेराव आत्राम, सुधीर पांडे, प्रशांत गोंडे, विजय गोपेवार, अमोल गोहणे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.