कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
हिंगणघाटतालुक्यातील वेणी येथील घटना
वर्धा
सचिन महाजन/जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट तालुक्यातीलवडनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वेणी येथील राजेंद्र वाल्मिकराव ठाकरे वय ६८ वर्ष या शेतकऱ्यांनी कर्जामुळे त्रस्त झाल्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.८जुलै रोजी रोज गुरूवारला उघकीस आली . राजेंद्र वाल्मिक ठाकरे यांचे शेत बोपापूर शिवारात असून त्यांनी आपल्या शेतीच्या बी बियाणासाठी सन २०१९ मध्ये पोहना येथील बँक ऑफ इंडिया चे पीक कर्ज घेतले असल्याने सततच्या दुष्काळी परस्थितीमुळे पीक पाणी होत नसल्याने शेती पूर्ण डबघाईस
गेल्याने कर्ज परत फेड कुठून द्यायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा सतत येत असल्याने सध्या कोरोनाच्या वाढत्या लॉकडाऊन मुळे मुलगा पण घरीच मग परिवारचा गाडा कसा चालवायचा हा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने या तणावापोटी ते चिंतेत राहायचे त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिगडत गेले असल्याने ते नेहमी आजारी राहायचे या सर्व तणावातून चिंतेतून यांनी वेणी शिवरातील इटेकार यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली असल्याने घटना शेजारी शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्यासाठी जात असताना ही घटना उघडकीस आली..त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा आपत्य परिवार पाठीमागे आहेत. त्यांच्या अश्या आकस्मित जाण्यामुळे परिवारावर आता दुःखाचा डोंगर उभा राहिला आहेत. वडणेर पोलीस पुढील तपास राजेंद्र शेट्टे यांच्या मागदर्शनात पोलीस कर्मचारी अमित नाईक,लक्ष्मण केंद्रे पुढील तपास करीत आहेत