धक्कादायक घटना, येनक जंगलात ५०वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला
दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय
प्रतिनिधी/ धनराज भोयर
शिरपुर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या येनकच्या जंगलात शिवणी च्या इसमाची दगडाने ठेचुन हत्या संशय व्यक्त केला जात आहज. या धक्कादायक घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .मृतक शेषराव गजानन पिंपळशेंडे वय (५०) रा.जुनी शिवणी असे खुन झालेल्या इसमाचे नाव असुन तो शेषराव हा इलेक्ट्रिकलचे काम करीत असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शेषराव घरुन कामानिमित्त गेले असल्याने ते घरी वापस आले नसल्याने घरच्यांनी शेषराव याचा शोध घेतला असता तर पता लागला नसल्याने
कुटुंबातील सदस्य शोध घेत असताना आज मंगळवार दि.१३ जुलै ला दुपारी १२ वाजताचे दरम्यान येनक जंगल शिवारात गुरे चारणाऱ्यांना एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती येनक येथील पोलिस पाटलांना फोनवर देण्यात आली असता पोलिस पाटलांनी लगच या घटनेची माहिती शिरपुर पोलिस स्टेशनला दिली. शिरपुर स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन लुले पोलीस कर्मचारी यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले या घटनेचा पोलिसांनी पंचमाना करून शेषराव यांच्या तोंडावर, डोक्यावर दगडाने अज्ञात आरोपीने मारले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असुन. मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणी मृतकाचा मुलगा सौरभ शेषराव पिंपळशेंडे याने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भादंवी कलम ३०२ नुसार अज्ञात आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सुरु असुन, शिरपुर पोलीस स्टेशनचे निरिक्षक सचिन लुले या घटनेचा तपास करीत आहे.