प्रियसीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने केले गर्भवती
प्रतिनिधी :पंकज नेहारे
पिडीत मुलीच्या नात्यातील युवकाने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवत प्रियसी लैंगिक शोषण करत गर्भवती केले असल्याने. पिडीत मुलीने गर्भवती असल्याची माहिती प्रियकराला सांगीतली असता प्रियकराने हात वर करत तो मी नव्हेच भूमिका घेतली. अखेर पिडीत मुलीने आरोपी विरोधात मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली.
संशयीत आऱोपी अरुण रामकिसन बोंड्रे (२५) सोनूपोड येथील रहिवाशी आहे. त्याच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर अरूण याचे नातेवाईक असल्याने तो नातेवाईकाकडे गेला त्याच नातेवाईका पिडीत मुलगी आली होती. दोघांची नजरानजर मिळून. पाहुणचार झाल्यानंतर प्रियकर गावाला निघून गेला. मात्र जाताना दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले.
गावाला गेल्यानंतर त्यांचे मोबाईलवर प्रेमाच्या गोष्टी बोलणे सुरू झाले. त्यांच्या प्रेमाला अजून बहर आला. दोघांनी लग्नाच्य शपथा घेतल्या. प्रियकराचे मुलीच्या गावी जाणे येणे वाढले. नात्यातीलच असल्याने पीडितेच्या कुटुंबीचा प्रियकरावर संशय घेतला नाही. तो घरी येत असल्याने त्याने देखील प्रेयसीला कधी तुम्ही पण घरी या असे आमंत्रण दिले.
१५ एप्रिल रोजी गुरूवारला प्रियकराने प्रेयसीला घर दाखवण्याच्या बहाण्याने सोनूपोड येथे घरी बोलावले. नातेवाईकच असल्याने पिडीत मुलीच्याआईवडिलांनीही परवानगी दिली. प्रेयसी प्रियकराच्या घरी पोहोचली. तिथे प्रियकराने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पीडितेचे आई वडिल नसताना वारंवार तिच्या घरी जायचा. या काळात त्याने अनेकदा पिडीत मुलीचे शोषण केले.
दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे प्रेयसीने प्रियकराला माझ्या पोटात तुझ्या बाळाच्या अंकुर वाढत असल्याने लग्नाबाबत विचारणा केली. मात्र प्रियकराने 'तो मी नव्हेच' म्हणत हात वर केले. त्यानंतर तिने अनेकदा प्रियकराला लग्नाबाबत विचारले मात्र प्रियकर कायम लग्नाची गोष्ट टाळत होता.
अखेर पीडितेने ही बाब आपल्या आईवडिलांना सांगितली. त्यांनी याबाबत पीडित मुलीला आई वडील घेवून तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयीत आरोपी अरुण रामकिसन बोंड्रे (२५) याच्याविरोधात भादंविच्या कलम भादंविच्या कलम ३७६ (२N) व ४१७ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल चौधऱी करीत आहे. तक्रार देण्याची माहिती संशायित आरोपीला लागताच आरोपी फरार झाला आहे.