फुकटा येथे समता सैनिक दलाची सभा व कार्यकारिणी जाहीर
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन
हिंगणघाट: ग्रामपंचायत फुकटा ता.हिंगणघाट जि. वर्धा येथील बुध्द विहारात झालेल्या सभेत समता सैनिक दलाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.वर्धा जिल्हा युनिटद्वारे *गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्या संदर्भात जिल्हा सह-संघटक मार्शल अविनाश गायकवाड तसेच जिल्हा समन्वयक मार्शल गौतम देशभ्रतार यांच्या संमनवयातून फुकटा येथील बौद्ध विहार ता.हिंगणघाट जि.
वर्धा येथे सभा संपन्न झाली.यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून मार्शल उमेशराव कांबळे(बौद्ध विहार कमिटी अध्यक्ष) तर प्रमुख अतिथी म्हणून *तालुका संघटक मार्शल मनोज थुल*,मार्शल हर्षल गजभिये उपस्थित होते.सभेत मार्शल मनोज थूल यांनी समता सैनिक दलाची पार्श्वभूमी सांगून वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या अभियानाबाबत माहिती दिली. त्यानंतर फुकटा येथील शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. समता सैनिक दल शाखा संघटकपदी मार्शल वैभव फुलझेले,सहसंघटक नितीन बेताल, शाखा निमंत्रक मयूर खैरे, शाखा प्रचारक आयुष पाटील,कोषप्रमुख निखिल कांबळे,प्रशिक्षक आदर्श कांबळे,प्रसिध्दी प्रमुख साहिल वणकर,बौद्धिक प्रमुख उमेशजी कांबळे, सूरक्षा प्रमुख सिध्दांत भगत, सुरक्षा प्रमुख संदीप पाटील,ह्या प्रमाणे कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
सदर सभेला वरील सर्व कार्यकारिणी तसेच मार्शल सम्यक पाटील,मार्शल राजरत्न तागडे,मार्शल सम्यक भगत,मार्शल अश्वमेघ वानखेडे, मार्शल सक्षम गायकवाड,मार्शल यश वनकर, मार्शल प्रज्वल कांबळे,मार्शल आदित्य बेताल,मार्शल प्रतीक कांबळे, मार्शल शालिनी पाटील, मार्शल स्वेता पाटील, मार्शल प्रज्ञा वावरे, मार्शल संगीता पाटील,मार्शल माला कांबळे, मार्शल चंद्रकला कंबळे,मार्शल उज्वला फुलझेले व समस्त बौद्ध बांधव तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती.