अल्पवयीन मुलीला फुस लावून अज्ञाताने पळवले,गुन्हा दाखल
मारेगाव तालुक्यातील सराटी येथील घटना
पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील मौजे सराटी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना आज दि.२०जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली असल्याने या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७वर्षीय मुलगी सकाळी उठून घरचे काम करत असताना काही वेळाने मुलगी घरी नसल्याने घराच्या व्यक्तीने शेजारी नातेसंबंधाकडे मुलीचा शोध घेतला असता तर शोध लागला नसल्याने आखेर मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत .पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अल्पवयीन मुलीला पळवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन यासंबंधी प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करत आहे.