जादुटोण्याचा संशय घेवून इसमास मारहाण
मारेगाव तालुक्यातील घटना
पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील केगाव (वेगाव) गावात भयानक घटना उघडकीस आली आहे. जादुटोण्याच्या संशयावरून एका इसमास घरा शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील तिन सदस्या मिळुन पांडुरंग महादेवराव पायघन या व्यक्तीस मारहाण केली .
पुरोगामी महाराष्ट्र आहे असे जरी म्हणत असले तरी, अजूनही 'अंधश्रद्धेचं भूत' काही जणांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. याच अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार घडत आहेत. मारेगाव तालुक्यातील भयानक प्रकार घडला आहे. जादुटोण्याच्या संशयावरून आतिष गणपत ठावरी वय वर्षे (२७) शिला आतिष ठावरी वय(२५) गिता गणपत ठावरी या तिघांनी मिळुन मारहाण केली असल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून त्या तिन संशायित आरोपी विरुद्ध कलमान्वये ३२३,५०४,५०६नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.