खर्रा आणायला गेलेल्या महिलेवर अत्याचार
संशायित आरोपीला पोलिसांनी केली अटक
भद्रावती तालुक्यातील घोसरी येथील काल सांयकाळी ९वाजतच्या सुमारास पानटपरी वर खर्रा आणायला गेलेल्या महिलेवर गावातील ४०वर्षीय पुरुषांनी पिडीत महिलेस कुठे चाली आहे म्हणून बोलता बोलता पिडीत महिलेला बळजबरीने उचलून जवळच्या शेतामध्ये नेवून अत्याचार केला असल्याने महिलेने आरडाओरडा करत पिडीत
महिलेचा मुलगा व पती धावत गेल्याने संशायित आरोपी विनायक बबन नगराळे यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला असल्याने आज १४जुलै रोजी पिडीत महिला आपल्या पती सोबत भद्रावती पोलीस स्टेशन गाठत संशायित आरोपी विनायक नगराळे यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संशयित आरोपी विरुद्ध कलम ३७६नुसार गुन्हा दाखल करुन संशायित आरोपीला अटक करण्यात आली आहे . या घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहे.