पंधरा हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला रंगेहाथ अटक
लाच लुचपत प्रतिबंध पथकाची कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पाथरी पोलीस स्टेशन येथील असलेल्या पोलीस शिपाई याच्यावर दि. १४जुलै रोज बुधवारला लाच लुचपत प्रतिबंध नागपूर विभागाच्या पाथरी पोलिस स्टेशन येथील पोलीस उमेश पोटावी यांना तक्रार कर्त्याच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने १५ हजार घेताना रंगेहाथ पकडून
पंचासमक्ष स्वीकारली असल्याने विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर लाच लुचपत प्रतिबंध नागपूर मीलिंद तोतरे अप्पर पोलीस अधीक्षक ,ला.प्र.वि. नागपूर . यांच्या मार्गदर्शनात अविनाश भामरे पोलीस अधीक्षक पोह मनोहर एकोनकर नपोशी संजय बागेसर पोशी नरेश ननावरे रोशन चांदेकर संजय वाघमारे चालक पोलिस शिपाई सतीश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या पथकाने सदर कारवाई करण्यात आली सदर प्रकरणाचा अधिक तपास अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी केली